अभयप्रभावना भेट…

सहल … दिवस आनंदाचा 💕💕💕

“सहल” या शब्दातच आनंद दडलेला आहे. सह म्हणजे सोबत , सर्वांच्या सोबत केलेला आनंदी प्रवास म्हणजे “सहल”.
दि. २८ फेब्रुवारी ला जैन विद्या शोध संस्थान च्या विद्यार्थिनी साठी “study tour ” म्हणून आपल्या सुषमताईनी अभय प्रभावना येथे ट्रिपचे नियोजन केले. नेहमी प्रमाणे खूप उत्साहात सर्वांचा प्रतिसाद मिळाला आणि सहलीचे सुरेख नियोजन सविता आणि साधनाने केले. ज्ञानात वृद्धी , आनंदात वृद्धी आणि यथेच्छ खाऊन वजनात वृद्धी असा त्रिवेणी संगम ह्या सहली मधे झाला.
अभय प्रभावना म्यूजियम म्हणजे उद्योगपती अभय चोरडिया यांचा जिद्दीचा प्रकल्प.
“जिद्द -जैन मूल्यांचा आणि सिद्धांताचा प्रचार करण्याची. समाजाला योग्य दिशा देण्याची. भारतीय संस्कृतीचे मूल्य दर्शविण्याची .आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आध्यात्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची.” सुमारे 55 एकर परिसरात पसरलेले मोठे संग्रहालयसुमारे 3.5 लाख चौ. फूट बांधकाम350 पेक्षा जास्त कला-कृती, शिल्प आणि चित्रे आधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल, अॅनिमेशन आणि डिजिटल प्रदर्शन यामुळे प्राचीन जैन तत्त्वज्ञान समजणे सोपे झाले. कल्पकतेने तयार केलेल्या गॅलऱ्यांमध्ये जैनधर्माची माहिती जाणून घेताना मन भारावून जाते.Timeless Wisdom Gallery ,Culture and History Gallery Path to Happiness ,Indic Values Gallery Open Air Heritage Walk यांचा अनुभव घेण्यात दिवस कसा गेला कळलेच नाही.विशाल मानस्तंभवरुन सभोवतालच्या परिसराचे दर्शन म्हणजे एक - सुखद अनुभव. Open Air Heritage Walk मधे मनसोक्त फोटो काढले. दिवसभर झालेला प्रवास आणि चालणे यानी कोणाला थकवा तर दूर उलट खूप उत्साह आणि आनंद वाटत होता आणि पुढच्या ट्रिप चे नियोजन करायला पण सुरुवात झाली होती.एकमेकांच्या सोबत राहून दिलखुलासपणे गप्पा गोष्टी गाणी आणि खाणं याचा मनमुराद आनंद लुटत दिवस खूप आनंदात गेला. नवीन ऊर्जा मिळाली.

ट्रिप खूप छान झाली…
थैंक्स सुषमाताई आणि दादा.. आमच्या सर्वांची जबाबदारी घेऊन छान छान ठिकाणी ट्रिप काढता.🙏
सविता आणि साधना ट्रिप चे नियोजन खूप छान आणि परफेक्ट 👌 🙏

संपर्क

जैन विद्या शोध-संस्थान, 'रत्नत्रय', फ्रेंड्स कॉलनी, शिवाजी पार्क, कोल्हापूर – 416001,
संपर्क- 9881250151